Join us

Video : 'शरद पवारांच्या खांद्यावर बसून उंची मोजू नका, रोहित दादा जरा खाली उतरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 12:24 PM

रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात.

ठळक मुद्देरोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात.

मुंबई - भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. औरंगाबादला जाताना, रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. 

रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. आपण खूप मोठे नेते झालो आहोत, या अविर्भावात ते असतात. मात्र, शरद पवार यांच्या खांद्यावरुन तुम्ही तुमची उंची मोजू नका. रोहित दाद, जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, अशा शब्दात पडळकर यांन रोहित पवारांवर थेट कर्जत-जामखेड मतदारसंघातून टीका केली.

पडळकर यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील मीरजगावातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी तेथील रस्त्याची दूरवस्था व्हिडिओच्या माध्यमातून मांडली. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वाला सल्ले देता. हे सल्ले देण्यापेक्षा कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांचे प्रश्न जाणून घ्या. राज्यात तुमचे सरकार आहे, येणाऱ्या काही दिवसांत तुम्ही मतदारसंघातील रस्ते चांगले करावेत, मग इतरांना सल्ले द्यावेत ही विनंती, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. 

आमदार रोहित पवार यांनी 'राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला' असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात,' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. त्यांनी यासंदर्भात ट्विट करुन फडणवीसांवर निशाणा साधाल होता. “राजा उदार झाला अन हाती भोपळा दिला असं म्हणताना देवेंद्र फडणवीस आपण चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात. कारण ही म्हण केंद्र सरकारला तंतोतंत लागू होतेय. पण आता येत्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर तरी हाती भोपळा न देता राज्याला हक्काचा निधी द्यावा, ही अपेक्षा,” असं ट्विट करत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. 

रोहित पवारांच्या या टीकेनंतर पडळकर यांनी थेट कर्जत-जामखेड मतदारसंघात जाऊन रोहित पवारांवर टीका केली आहे.  

टॅग्स :रोहित पवारशरद पवारगोपीचंद पडळकर