रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:53 AM2020-12-15T02:53:09+5:302020-12-15T06:44:08+5:30

५६० जणांकडून ४३ हजारांचा दंड वसूल

Dont motivate us for night curfews says bmc commissioner iqbal singh chahal | रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

रात्रीच्या संचारबंदीसाठी आम्हाला प्रवृत्त करू नका; महापालिका आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

Next

मुंबई : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर महानगरपालिकेचे लक्ष आहे. याच पार्श्वभूमी सांताक्रुझ, लोअर परळ, दादर, तसेच वांद्रे परिसरातील पब आणि हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगरण्यास सुरुवात करण्यात आली असून, ५६० जणांकडून ४३ हजार रुपये दंडाच्या स्वरूपात आकारण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेला रात्रीच्या वेळी संचारबंदी (कर्फ्यू) लावण्यास प्रवृत्त करू नका, असे आवाहन पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी मुंबईकरांना सोमवारी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांताक्रुझमधील बॉम्बे अड्डा या पबमध्ये धाड टाकली. यावेळी २७५ व्यक्तींनी मास्क घातले नव्हते. त्यानुसार, पालिकेने त्यांना ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दादरच्या प्रीतम हॉटेलमध्येही १२० जणांवर आणि रुड लॉजवरही अशीच कारवाई करण्यात आली. लोअर परळ, वांद्रे परिसरातही मास्क न घालणाऱ्या, तसेच फिजिकल डिस्टन्सचे नियम न पाळणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करत ५६० जणांकडून पालिकेने दंडाच्या स्वरूपात ४३ हजार २०० रुपये वसूल केले.

कोरोना अजूनही संपलेला नाही
कोरोना अजूनही संपलेला नाही, याचे भान मुंबईकरांनी ठेवावे आणि गर्दी करणे, मास्क लावणे हे नियम पाळावे, अशी विनंती चहल यांनी केली. आम्ही रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याच्या विरोधात आहोत. त्यामुळे बेशिस्तपणे वागून आम्हाला ती लागू करण्यास प्रवृत्त करू नका, अशा भाषेत त्यांनी नागरिकांना समजही दिली.

Web Title: Dont motivate us for night curfews says bmc commissioner iqbal singh chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.