Join us

दगदग करू नको, तब्येतीला जप; पंकजा यांचा धनंजय मुंडे यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 7:54 AM

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंबई :  

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना प्रकृती अस्वास्थामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दिवसभर अनेक नेते मंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेत त्यांची विचारपूस केली.

सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मात्र, हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती, असे पवार यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर काही वेळात धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनीही रुग्णालयात येऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काळजी, दगदग करू नको, तब्येतीला जप. शेवटी तब्येत महत्त्वाची आहे,  असा सल्ला पंकजा यांनी त्यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत आई आणि दोन्ही बहिणीही होत्या.

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडे