मुंबई शहरातील विशेषत: उपनगरातील रेडी रेकनरचे दर वाढवू नका- आमदार अतुल भातखळकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 09:36 PM2020-01-29T21:36:26+5:302020-01-29T21:36:38+5:30
मुंबई शहरातील विशेषत: उपनगरातील रेडी रेकनरचे दर वाढवू नका,
मुंबई- मुंबई शहरातील विशेषत: उपनगरातील रेडी रेकनरचे दर वाढवू नका, किंबहुना 500 चौ. फुटांच्या सदनिकांच्या रेडी रेकनरचे दर कमी करा, अशी आग्रही मागणी कांदिवली (पूर्व) येथील भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली.
रेडी रेकनरचे दर ठरवताना केवळ विभागनिहाय विचार न करता सिटी सर्व्हेनुसार करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी विषद केली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या योजना तसेच ट्रान्झिट कॅम्प येथे रेडी रेकनरचे दर कमी असावेत. तसेच निरनिराळ्या विकास प्रक्रल्पांना त्यांच्या दर्जानुसार दर असावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. एकंदरीत रेडी रेकनरचे दर अधिक शास्त्रीय पद्धतीने ठरवण्याची आवश्यकता असून उच्च न्यायालयाने मागावलेली माहिती लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी शेवटी केली.