Join us

पीओपीच्या गणेशमूर्तीकरांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई मनपाचे धाडसत्र थांबवा, कारवाईविरोधात आशिष शेलार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 12:56 PM

POP Ganesh Murti : मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत.आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई - पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले तरी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका,  मुंबई महापालिकेने हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबावावे, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमि आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

मुंबई महापालिकेने यावेळी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्ती ४ फुटांच्या असाव्यात, त्या शाडूमातीच्याच असाव्यात, याची अंमलबजावणी करताना पालिका धाड सत्र सुरू करणार आहे. आज याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुर्ती पर्यावरणपुरक असावी हा आग्रह धरायला हरकत नाही. म्हणून एकाकी पिओपीच्या मुर्ती बनविणाऱ्यांंच्या पोटावर पाय देऊ नये. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. तसेच मुर्तीकारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. याबाबत निर्णय येणे बाकी असताना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारु नये. या व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यामुळे एकाकी त्यावर निर्बंध आणले तर मराठी व्यवसायीक उध्वस्त होतील. हा हिंदूचा सण आहे. धाडसत्र, मुर्ती जप्त करणे अशी विघ्न पालिकेने आणू नये, अशी मागणी  आशिष शेलार यांनी केली.

टॅग्स :आशीष शेलारमुंबई महानगरपालिकागणेशोत्सवविधानसभा