ठळक मुद्देआजवर तू जे 'मराठा प्राईड' साठी केलं म्हणतेस तो 'गौरव' नाही!त्याला आम्ही लाज काढणे म्हणतो! जी तू वेळोवेळी काढली आहेसच आता आमच्या आई बापाचा अभिमान आम्हाला किती आहे, हे तू सांगु नकोस!
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने निर्माण झालेला वाद आता अधिकाधिक चिघळत आहे. दरम्यान, कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत असून, मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकारांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहे. दरम्यान, अभिनेता हेमंत ढोमे यानेही कंगनावर टीका केली असून, आमच्या आई बापाचा अभिमान आम्हाला किती आहे, हे तू सांगु नकोस, असा सल्ला त्याने आपण मराठा असल्याच्या आणि लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट काढल्याचे विधान करणाऱ्या कंगना राणौतला दिला आहे.हेमंत ढोमेने ट्विट करून कंगनाचा समाचार घेतला आहे. ''आजवर तू जे 'मराठा प्राईड' साठी केलं म्हणतेस तो 'गौरव' नाही! त्याला आम्ही लाज काढणे म्हणतो! जी तू वेळोवेळी काढली आहेसच आणि आता आमच्या आई बापाचा अभिमान आम्हाला किती आहे, हे तू सांगु नकोस! तुझा केविलवाणा जातियवादी खेळ बंद कर, ताई महाराष्ट्राच्या नादी लागू नकोस!,'' असा इशाराच हेमंत ढोमेने दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्विटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, याचदरम्यान कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची (पीओके) उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. रितेश देशमुख, केदार शिंदे, स्वप्नील जोशी, स्वरा भास्कर रेणुका शहाणे यांनी कंगनाच्या ट्विटला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.कंगनावर संजय राऊत भडकले; "मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच, दुष्मनांचे श्राद्ध घालू"यातच कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, असे आव्हान दिल्याने हा वाद आता चिघळण्याची मोठा शक्यता निर्माण झाली आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे भडकले असून त्यांनी शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही, असा थेट इशारात दिला आहे. कंगनाला उद्देशून त्यांनी ''मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.'', असे तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे.काय म्हणाली होती कंगना?सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर सतत मत मांडणा-या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. त्यानंतर कंगनाने एक ट्विट केले आहे. ह्यशिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?ह्ण, असे कंगनाने म्हटले आहे.