मुंबई : कुणाचे वय किती आहे ? आपण आपल्या वयाचा विचार करु नका, जे आयुष्य आपल्याला मिळालेले आहे त्याचा आनंद उपभोगा. 'फर्गेट युवर एज, एन्जॉय युवर लाईफ' हे मीना नाईक यांचे सूत्र अतीशय प्रेरणादायी आहे आणि मला हीच प्रेरणा माझे कर्तव्य बजावतांना उपयोगी येते, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस अधिकारी दिपाली खरात यांनी एअर इंडियाच्या निवृत्त अधिकारी व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मीना नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
बोरीवली पूर्व येथील कंट्री पार्क महिला मंचच्या विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त 'एक शाम, सखीयोंके नाम' या शीर्षकाखाली समाजाच्या सर्व थरांतील महिलांचा गौरव समारंभ मीना नाईक यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी दिपाली खरात उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते घरेलू महिला कर्मचारी ते प्रतिष्ठित महिला यांचा सन्मान करण्यात आला. बोरीवली ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांच्या सह अनेक मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
मीना नाईक, मुक्तमाला सरकार, मंगला सावंत, सारिका सुर्वे, निर्मला कांबळे, इर्षा सुर्वे, पूजा माईणकर, कीर्ति सुर्वे, नलिनी पाठाडे, शलाका सरकार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.