मुंबई : आमंत्रण पत्रिका लग्न पत्रिका व इतर पत्रिका जी आपण कचऱ्यात टाकतो. त्यावर देवदेवतांचे फोटो व धर्माचे चिन्ह असतात त्यामुळे कुठे देवदेवतांचा अपमान होतो. पत्रिका ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कुठल्याही धर्माचे असो जर स्वप्नाक्षय मित्र मंडळाला आम्हाला आणून दिली, तर त्यापासून कागदाच्या लगद्यापासून श्री गणेशाची मूर्ती बनू शकते आणि श्री गणेशाची मूर्ती ही सर्व धर्मीय नागरिकांची असू शकते. एक चांगला आदर्श समाजात होवू शकतो. कागदाच्या लगद्यापासून मूर्ती ८ फूटापासून ते २० फूटांपर्यंत बनू शकते.
स्वप्नाक्षय मित्र मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक व माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर व सल्लागार प्रशांत काशीद यांची ही अभिनव संकल्पना आहे. दरवर्षी आकर्षक व पर्यावरणपूरक देखावे सादर करणाऱ्या या मंडळाला यंदा सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. यंदा या मंडळाला मुंबई महानगर पालिकेचा तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे मंडळाची जबाबदारी वाढली असल्याने यंदा आमच्या मंडळाने ही अनोखी संकल्पना राबवली. या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षणातज्ञ प्राचार्य अजय कौल सरांच्या हस्ते लवकर होणार आहे अशी अशी माहिती त्यांनी दिली.
पी.ओ.पी. च्या मूर्त्या या पाण्यात लवकर विरघळत नाहीत. पर्यावरणपूरक मूर्त्या पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका पोहचू शकत नाही. वर्सोवा मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळांतर्फे एक ड्रम तयार केला आहे. चाचा नेहरू उद्यान, वर्सोवा मेट्रोस्थानकाजवळ मॉडेल टाऊन जे.पी.रोड, अंधेरी पश्चिम येथे पत्रिका आणून द्याव्यात. श्रीगणेशाच्या चार महीने आगमनाअगोदर आम्ही त्या भिजवून मुर्तीकाराला देवू. त्यानंतर मूर्तीकार कागदाच्या लगद्यापासून मूर्ती बनवेल. मुंबईतील सर्व गणेश मंडळांनी आपल्या विभागात हा उपक्रम राबवावा असे आवाहन बाळा आंबेरकर व सल्लागार प्रशांत काशीद यांनी केले आहे. अशाने एक चांगला आदर्श समाजात होवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.