'वारसांच्या वादात पडायचं नाही, आम्हाला पॉलिटीकल स्कोर करायचा नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:19 PM2020-01-16T15:19:07+5:302020-01-16T15:19:20+5:30
शिवाजी महाराजांबद्दलचं स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला
मुंबई - आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन महाराष्ट्रात चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. मात्र, या पुस्तकाच्या निषेधानंतर राज्यातील राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये अन् छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांमध्ये अप्रत्यक्षपणे तू तू मै मै पहायला मिळत आहे. उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, या शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून सध्या राज्यात वादाता तोंड फुटले आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला या वादात पडायचं नसल्याचं म्हटलंय.
गाढवांच्या गळ्यात संजय राऊत, आव्हाड यांच्या नावाची पाटी
शिवाजी महाराजांबद्दलचं स्थान आमच्या मनात कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या भांडणात आम्हाला पडायचा नाही. राजकीय पक्षांच्या भांडणातही आम्हाला पडायचं नाही, पॉलिटीकल स्कोर आम्हाला करायचा नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिलेली आहे, लोकांनी हे मानलेलं आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी त्यांना मानलेलं आहे, तेच आम्हाला महत्त्वाचं आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी समर्थन दिले आहे. ''गादीचे वारस वेगळे आणि रक्ताचे वारस वेगळे, असे विधान नवाब मलिक यांनी केले आहे. तसेच, राज्यसभेचे तिकीट मिळावे, यासाठी उदयनराजे भोसले यांनी लोटांगण घातले आहे, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
राम कदमांची संजय राऊतांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
दरम्यान, ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात बुधवारी आयोजित लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. तसेच शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी जनतेने दिली आहे. रक्षणकर्ता राजा असतो, लुटणारा राजा नसतो, असाही चिमटा त्यांनी काढला होता.