मुंबई - पौष महिना म्हटला की, विवाहकार्यानिमित्त कोठेच जाणे नको, असे समीकरण असते. मात्र, यंदा पौष महिन्यातही विवाहाचे मुहूर्त आहेत. मे आणि जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या मुहूर्तावर अवलंबून राहण्यापेक्षा जानेवारीपासूनच मुहूर्तांना प्राधान्य मिळत आहे.
यंदाच्या वर्षी ७७ दिवस शुभज्योतिषींच्या मते, २४ वर्षांनंतर मे आणि जूनमध्ये लग्नाचा एकही दिवस शुभ नसेल. त्याचे कारण दोन्ही महिन्यांत शुक्राचा अस्त आहे. शुक्र उदयानंतर जुलैमध्येच लग्नाच्या शुभ मुहूर्तांना सुरुवात होईल. सन २००० मध्येही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हादेखील मे आणि जूनमध्ये शुभ मुहूर्त नव्हता. २०२४ या नववर्षात लग्नाचे ७७ दिवस शुभ दिवस राहतील.
पौषच्या उत्तरार्धातही शुभकार्य पुष्य हे गुरूचे नक्षत्र आहे आणि गुरू ग्रह त्यागाचे प्रतीक आहे, असे सांगून हा महिना शुभकार्यासाठी चांगला असल्याचे या पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे यंदा पौष महिन्याच्या उत्तरार्धाला २५ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. जानेवारीतील २७, २८, २९, ३०, ३१ या सर्व दिवसांना, तसेच फेब्रुवारीतील ०१, ०२, ०३, ०४, ०५, ०६ या दिवसांनादेखील मुहूर्त असून, त्या दिवसांमध्येदेखील विवाह सोहळे होणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक मुहूर्त फेब्रुवारीमध्ये विवाहासाठी जास्तीत जास्त २० दिवस शुभ मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये ५ दिवस विवाह सोहळा शक्य होणार आहे. जानेवारीसह डिसेंबरमध्ये १० दिवसांचे शुभ मुहूर्त लाभणार आहेत. मार्चमध्ये ९ दिवस, जुलैमध्ये ८ दिवस, ऑक्टोबरमध्ये ६ दिवस आणि नोव्हेंबरमध्ये ९ दिवस लग्नाचे शुभ मुहूर्त मिळणार आहेत.खरमासानंतर पुन्हा मुहूर्तजेव्हा सूर्य गुरूच्या धनू किवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास असतो. खरमासाचे दिवस अशुभ काळ म्हणून गणले जातात. त्यामुळे लग्न, मुंडन, गृहप्रवेश या शुभकार्यांना मुहूर्त मिळत नाहीत. १४ जानेवारी पौष शुक्ल तृतीयेपर्यंत राहिल्यानंतर या शुभकार्यांना सुरुवात होऊ लागली आहे.