Join us

'काळजी करू नको, हे आपलं सरकार आहे', पीडित शेतकऱ्याला उद्धव ठाकरेंचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 9:59 AM

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका पीडित शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री

मुंबई - औरंगाबाद येथील शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आपल्यावर नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात भुसारे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली पीडित कहानी सरकार दरबारी मांडली. आपल्यावर मोठा अन्याय झाल्याची केविलवाणी भावना आणि संताप त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी, "काळजी करु नको, हे आपल सरकार आहे", असा विश्वास उद्धव ठाकरेंनी पीडित शेतकऱ्याला बोलून दाखवला.   

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका पीडित शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. याबाबत, कडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.  ''हा चेहरा अनेकजण आज ओळखणार नाही, ३ वर्षा अगोदर औरंगाबाद येथील शेतकरी रामेश्वर भुसारे शेडनेटचे नुकसान भरपाई मागण्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यास भेटायला गेले व भरपाई मिळालीच नाही तर सुरक्षारक्षक, अधिकाऱ्यांनीनी त्याला बेदम मारहाण केली. त्याला तुरुंगात टाकले तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांनी त्याला सोडवले.

3 वर्षानंतर अचानक त्याला पोलीस स्टेशन मधुन फोन येतो हजर व्हा नाहीतर अटक होईल. चौकशी केल्यावर कळले तत्कालीन सरकारनी चौकशीनंतर अधिकारी व सुरक्षारक्षकांना क्लिनचीट दिली व शेतकर्यावर गुन्हा दाखल केला. कलम 309 अंतर्गत भुसारेवर गुन्हा दाखल आहे. आज मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व अजित दादा पवार यांच्या सोबत रामेश्वर भुसारे यांची भेट करुन दिली व गुन्हा माफ करायची विनंती केली. "काळजी करु नको, हे आपल सरकार आहे" असा शब्द मुख्यमंत्री उध्दवजी यांनी शेतकर्यास दिला. 'या प्रकरणात सुरुवातीपासून शेवटपर्यत वाचा फोडणारा पत्रकार ब्रम्हा चट्टे याचे धन्यवाद!' अशा आशयाची पोस्ट बच्चू कडू यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे.  

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरेशेतकरीऔरंगाबाद