पावडरने पिकविलेली केळी तर खात नाही ना?; श्रावणातील उपवासामुळे वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:45 PM2023-09-08T12:45:21+5:302023-09-08T12:45:32+5:30

पावडर लावलेली केळी आरोग्यासाठी घातक असतात.

Don't you eat bananas grown with powder?; Demand increased due to fasting during Shravan | पावडरने पिकविलेली केळी तर खात नाही ना?; श्रावणातील उपवासामुळे वाढली मागणी

पावडरने पिकविलेली केळी तर खात नाही ना?; श्रावणातील उपवासामुळे वाढली मागणी

googlenewsNext

मुंबई : श्रावण सुरू झाला की, उपवासासाठी केळीची मागणी अधिक असते. बाजारात मोठ्या प्रमाणात केळी विक्रीसाठी येतात. मात्र, बऱ्याच ठिकाणी केळीला अधिक मागणी असल्याने पावडर लावून केळीची विक्री होत असल्याचे दिसते. अशी पावडर लावलेली केळी आरोग्यासाठी घातक असतात.

पावडर टाकून पिकविलेली केळी कशी ओळखाल?
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा देठ काळा असतो तर कृत्रिमरीत्या पिकविलेल्या केळीचा देठ हा  हिरवा किंवा पिवळा असतो. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीवर काळे छोटे- छोटे ठिपके असतात आणि ती चवीलाही गोड असतात.

उपवासामुळे मागणी वाढली 
श्रावण सुरू झाला की, अनेकांचे उपवास सुरू असतात. श्रावणी सोमवार, शनिवार, मंगळवार, गुरुवार, संकष्टी, गोकुळाष्टमी अशा उपवासांसाठी केळींची मागणी वाढते.

पूर्ण पिकलेली केळी नसल्यास घशाचा त्रास 
मागणी वाढल्याने कच्ची केळी पावडर लावून विक्रीसाठी बाजारात आणली जातात. अशी कच्ची केळी खाल्ल्याने घसा खवखवण्याचा त्रास होतो.

महिनाभरात एकही कारवाई  केलेली नाही 
श्रावण महिना संपून गणपती उत्सव जवळ आला तरी अन्न व औषध प्रशासनाने अशा पावडर लावलेल्या केळी विक्रेत्यांवर मुंबई परिसरात कारवाई केलेली नाही. बाजारात पावडर लावून विक्री होत असलेली केळी आढळल्यास आपण अन्न प्रशासनाच्या हेल्पलाइनवर किंवा कार्यालयात तक्रार करू शकता, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: Don't you eat bananas grown with powder?; Demand increased due to fasting during Shravan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य