मुंबई : दूरदर्शनचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनचे वृत्तनिवेदक यासह माध्यमतज्ज्ञ, संपादक, रंगकर्मी आणि लेखक अशी ओळख असलेल्या डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले होते. मुंबईतील मुलुंड पूर्व येथे डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे विश्वास मेहेंदळे हे पहिले वृत्त निवेदक होते. त्यानंतर मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. तसेच, 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत.
डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लोकमान्य टिळक यांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यांनी सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या 'ऐक्य' दैनिकाचे संपादक म्हणूनही काम केले आहे. पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच, मला भेटलेली माणसे हा त्यांचाय एकपात्री कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरला. शिवाय, त्यावेळी दूरदर्शनवर असलेला वाद संवाद हा कार्यक्रम मेहेंदळे यांच्या सूत्रसंचालनासाठी प्रसिद्ध होता.या पुरस्कारांनी गौरवअखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून 'मधुकर टिल्लू स्मृती एकपात्री कलाकार' या पुरस्काराने विश्वास मेहेंदळे यांचा सन्मान करण्यात आला होता. 25 मे 2017 रोजी विश्वास मेंहदळे यांना हा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सृजन फाऊंडेशनने महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात 2010 मध्ये भरवलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवले होते.
डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेली तसेच संपादित केलेली पुस्तकेआपले पंतप्रधानआपले वैज्ञानिकओली-सुकीइंदिरा गांधी व लीला गांधीकेसरीकारांच्या पाच पिढ्यागांधी ते पटेलतुझी माझी जोडीनरम-गरम (कथासंग्रह)नाट्यद्वयीपंडितजी ते अटलजीभटाचा पोर (वैचारिक)मला भेटलेली माणसंमला माहीत असलेले शरद पवार (संपादित ग्रंथ)मीडियायशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाणयशवंतराव ते अशोकरावयशवंतराव ते विलासरावराष्ट्रपतीसरसंघचालक