उपनगरात लवकरच बसणार डॉप्लर

By admin | Published: March 28, 2017 03:53 AM2017-03-28T03:53:51+5:302017-03-28T03:53:51+5:30

उपनगरात डॉप्लर रडार बसवण्यासाठी निश्चित केलेलीजागा ३१ मार्चपर्यंत भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) हस्तांतरित

Doppler will soon be available in the suburbs | उपनगरात लवकरच बसणार डॉप्लर

उपनगरात लवकरच बसणार डॉप्लर

Next

मुंबई : उपनगरात डॉप्लर रडार बसवण्यासाठी निश्चित केलेलीजागा ३१ मार्चपर्यंत भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) हस्तांतरित करण्यात येईल, अशी माहिती सोमवारी मुंबई म्पालिकेने उच्च न्यायालयाला दिली. त्यावर उच न्यायालयाने आयएमडीला जागा मिळाल्यानंतर डॉप्लर बसवण्याचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
२०१५ मध्ये मुसळाधार पावसामुळे मुंबई ठप्प झाली होती. यासंदर्भात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत पालिकेच्या वकिलांनी महाकालीजवळील वेरावली येथील भूखंड मार्चअखेर आयएमडीला हस्तांतरित करणार असल्याची माहिती मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व
न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.
२००५ मध्ये मुंबईवर आलेली जलप्रलयाची स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून राज्य सरकारने नेमलेल्या समितीने उपनगरात आणखी एक डॉप्लर रडार बसवण्याची शिफारस अहवालात केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी न केल्याने २०१५ मध्येही पावसाने मुंबईला वेठीस धरले. त्यामुळे समिती अहवालावर अंमलबजावणी करावी, अशी मागणी याचिकाकर्ते अटल दुबे यांनी केली आहे. गेल्या सुनावणीत आयएमडीने पालिकेने ९० कोटींचा प्रिमीयम मागितल्याचे खंडपीठाला सांगत ही रक्कम कमी करण्याचे निर्देश महापालिकेला द्यावेत, अशी विनंती खंडपीठाला केली होती. त्यावर भूमिका स्पष्ट करताना महापालिकेने रक्कम कमी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Doppler will soon be available in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.