मुंबईकरांना ९८ लाख लसींची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:11+5:302021-09-05T04:11:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागणार आहे. मुंबईत आतापर्यंत ...

Dosage of 98 lakh vaccines to Mumbaikars | मुंबईकरांना ९८ लाख लसींची मात्रा

मुंबईकरांना ९८ लाख लसींची मात्रा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागणार आहे. मुंबईत आतापर्यंत ९८ लाख दोन हजार ९९५ लाभार्थींना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहे. यात ७० लाख ३३ हजार ६४० लाभार्थींना पहिला डोस, तर २७ लाख ६९ हजार ३५५ लाभार्थींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

सध्या मुंबईत ५०७ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. यापैकी ३२५ सरकारी केंद्र आहे, तर १८२ केंद्र हे खासगी आहे. शहर उपनगरातील खासगी लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ४३ लाख ४० हजार ७३४ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात ३३ लाख ७० हजार २७६ लाभार्थींना लसीचा पहिला डोस, तर ९८ हजार ४५८ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

केंद्र शासनाने खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली आहे. मात्र सार्वजनिक क्षमतेच्या ७५ टक्के आणि खासगी लसीकरण केंद्राचा २५ टक्के वाटा असे समीकरण ठरले आहे. सातत्याने लसीचा तुटवडा भासत असल्याने हे समीकरण उलटे झाले असून ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान मुंबईत पाच लाख ९३९ जणांना लस देण्यात आली. त्यातील दोन लाख ७६ हजार ७६५ डोस खासगी केंद्रात देण्यात आले.

मुंबईत सर्वाधिक डोस २७ ऑगस्टला

कोविन ॲपवरील माहितीनुसार मुंबईत मागील महिन्याभरात सर्वाधिक डोस २७ ऑगस्टला देण्यात आले होते. या दिवशी एक लाख ७७ हजार १७ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली होती. या शिवाय २१ ऑगस्टला एक लाख ६३ हजार ७७५ नागरिकांना, तर २३ ऑगस्टला एक लाख ५३ हजार ८८१ नागरिकांना लस देण्यात आली होती.

विभाग एकूण लसीकरण

फ्रंटलाइन/आरोग्य कर्मचारी ७,३९,२६८

६० वर्षांवरील १८,३१,६८५

४५ ते ५९ वयोगट २८,०७,६८९

१८ ते ४४ वयोगट ४३,७९,६५९

स्तनदा माता ७२२१

गर्भवती १०९७

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, व्यावसायिक ३३१०

ओळखपत्र नसलेले २९८४

अंथरुणाला खिळलेले ३७३७

Web Title: Dosage of 98 lakh vaccines to Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.