अल्पसंख्याक विद्यार्थांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण विद्यावेतनात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:04 AM2020-10-08T02:04:31+5:302020-10-08T02:04:36+5:30

मुंबई : अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात  दुपटीने वाढ ...

Doubling of pre-competitive training scholarships for minority students | अल्पसंख्याक विद्यार्थांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण विद्यावेतनात दुपटीने वाढ

अल्पसंख्याक विद्यार्थांच्या स्पर्धापूर्व प्रशिक्षण विद्यावेतनात दुपटीने वाढ

Next

मुंबई : अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात  दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

त्यांना आता प्रति महिना २ हजार रुपयांऐवजी ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. २०२१-२१ या शैक्षणिक वर्षापासून हे दिले जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी दिली.

अल्पसंख्याक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि ज्यू समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अल्पसंख्याक समाजातील निवडक, होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना सध्या महिना रु. २ हजार विद्यावेतन देण्यात येते. तथापी, उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रति महिना ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.
अशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.

Web Title: Doubling of pre-competitive training scholarships for minority students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.