पासधारक विद्यार्थ्यांना प्रवासात दुजाभाव

By admin | Published: September 12, 2014 11:48 PM2014-09-12T23:48:04+5:302014-09-12T23:48:04+5:30

राज्य परिवहन मंडळाच्या हात दाखवा... एस.टी. थांबवा, बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत

Doubt in the journey to pass hold students | पासधारक विद्यार्थ्यांना प्रवासात दुजाभाव

पासधारक विद्यार्थ्यांना प्रवासात दुजाभाव

Next

म्हसळा : राज्य परिवहन मंडळाच्या हात दाखवा... एस.टी. थांबवा, बहुजन हिताय बहुजन सुखाय या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. या संकल्पना चालक -वाहकांपर्यंत पोहचतात की नाही, असा प्रश्न चांढोरे ग्रामस्थांना पडला आहे.
श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन-मिरज गाडी नं. २४५४ च्या चालकाने चांढोरे बसस्थानकावर ५ ते ६ विद्यार्थ्यांनी हात दाखविल्यामुळे बस थांबविली, परंतु वाहक पी.एन. जोशी (९४९२४) याने तुमचा पास आहे का अशी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी पास असल्याचे सांगताच कंडक्टर जोशीने त्रागा करुन दरवाजा न उघडताच आतून लॉक व पट्टी टाकून एस.टी.च्या ध्येय धोरणालाच काळिमा फासला व विद्यार्थ्यांनाही अपमानित केल्याची तक्रार एस.टी.तील काही प्रवाशांनी कंट्रोलर म्हसळा-डेपो मॅनेजर श्रीवर्धन यांच्याकडे केली असल्याचे गाडीतील प्रवासी व म्हसळा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश शिर्के यांनी सांगितले.
चांढोरा गावातून माणगांव-लोणरे-म्हसळा-मोर्बा-तळा भागात दररोज किमान २०० विद्यार्थ्यांची जा-ये असते अशा पद्धतीने श्रीवर्धन डेपोच्या वाहकांची उर्मटगिरी असेल व त्यांच्यात सुधारणा होणार नसेल तर चांढोरे ग्रामस्थांचे वतीने रास्ता-रोकोसारखे सनदशीर आंदोलनाचे चोख उत्तर देण्यात येईल, असे चांढोरे गांवचे सरपंच-उपसरपंच विष्णू भोसले व सुजित शिंदे यांनी सांगितले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Doubt in the journey to pass hold students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.