महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी सर्वसमावेशक ‘डीपीआर’ करावा-सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:21 AM2019-06-18T01:21:19+5:302019-06-18T01:21:28+5:30

धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोईसुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करावा, अशा सूचना उद्योगमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केल्या.

'DPR' should be made for development of Mahalaxmi temple complex - Subhash Desai | महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी सर्वसमावेशक ‘डीपीआर’ करावा-सुभाष देसाई

महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी सर्वसमावेशक ‘डीपीआर’ करावा-सुभाष देसाई

Next

मुंबई : महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंदिर ट्रस्ट आणि म्हाडाने संयुक्तरीत्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोईसुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करावा, अशा सूचना उद्योगमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केल्या.

देसाई यांनी सोमवारी महालक्ष्मी मंदिर आणि परिसराला भेट देऊन पाहणी केली. मंदिर परिसरातील जुन्या इमारतींचा विकास जरीवाला मॅन्शनच्या धर्तीवर अतिरिक्त एफएसआय देऊन करता येईल. जुन्या इमारतींबाबत मंदिर समिती व स्थानिकांच्या हक्काला बाधा येणार नाही याची शासन काळजी घेईल. सुनियोजित विकासासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीचा पुनर्विकासही आवश्यक असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.
यावेळी देसाई यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. वास्तुविशारद आभा लांभा यांनी मंदिर परिसर विकासाबाबत बनविलेल्या आराखड्याची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, नगरसेविका सरिता पाटील, म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्याधिकारी शहाजी पवार, सहायक पालिका आयुक्त विश्वास मोटे, मंदिर समितीचे विश्वस्त विजय गोखले, विजय गुपचूप, वास्तुविशारद आभा लांबा आदी उपस्थित होते.

पर्यायांबाबत विचार
मंदिराच्या मागे समुद्राच्या बाजूने गेट वे आॅफ इंडिया परिसराप्रमाणे विकास करण्यास वाव आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येण्या-जाण्यास पुरेशी जागा उपलब्ध होईल. शिवाय, मंदिराला चारही बाजूने रस्त्यांनी जोडणे शक्य होईल. अशा स्थितीत मंदिरासमोरील पूजासाहित्य विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. मंदिरामागील बाजूने कोस्टल रोडशी जोडता येईल का, या पर्यायाबाबतही विचार करण्यात येईल, असेही देसाई म्हणाले.

Web Title: 'DPR' should be made for development of Mahalaxmi temple complex - Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.