Join us

डॉ. अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींकडे दुर्लक्ष, पुलांच्या विकास कामांना ग्रीन सिग्नल मिळालाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:54 AM

प्रख्यात वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या शिफारशींची मध्य रेल्वेने अंमलबजावणी न केल्याने शुक्रवारचा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

- योगेश बिडवई।मुंबई : प्रख्यात वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सुरक्षाविषयक समितीने केलेल्या शिफारशींची मध्य रेल्वेने अंमलबजावणी न केल्याने शुक्रवारचा अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईची लोकल लालफितीत अडकल्याने समितीच्या शिफारशींनुसार पुलांच्या विकास कामांना रेल्वे प्रशासनाकडून ग्रीन सिग्नलच मिळाला नाही.समितीने रेल्वे सुरक्षेबाबत सर्वंकष अहवाल सादर केला. मुंबईत लोकलने प्रवास करणा-यांच्या वाढत्या संख्येबाबत नोंद घेण्यात आली होती.मुंबईची लोकल ही ‘हाय ट्राफिक डेन्सिटी’मध्ये मोडते. प्रवाशांच्या संख्येच्या मानाने लोकल सेवा फारच अपुरी पडते. सिग्नल यंत्रणा सुधारल्यास आणखी लोकल सेवा सुरू होऊ शकतील. सुरक्षेचे अत्याधुनिक उपाय तातडीने योजले पाहिजेत.- डॉ. अनिल काकोडकर, अध्यक्ष, रेल्वे सुरक्षा आढावा समिती

टॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमुंबई