डॉ. बी. आर. कुमार यांना ‘गऊ भारत भारती’ सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:17 AM2020-12-04T04:17:47+5:302020-12-04T04:17:47+5:30
खासगी सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान फोटो मेल केला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खासगी सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान ...
खासगी सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान
फोटो मेल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खासगी सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबाबत डॉ. बी. आर. कुमार अगरवाल यांना ‘गऊ भारत भारती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या संपादकीय मंडळाने नुकतीच राज भवनवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
गऊ भारत भारती याच्या माध्यमातून गौ, गंगा आणि गायत्री या विषयाला धरून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे. तसेच विविध क्षेत्रांतून समाजाप्रति त्यांची जबाबदारी निस्वार्थपणे निभावत आहेत. या गुणवंतांना दरवर्षी सन्मानित केले जाते. या पुरस्काराच्या आयोजकांनी यावर्षीही काही सन्मानितांच्या नावाची घोषणा केली आहे. हा सोहळा राजभवन येथे ३१ डिसेंबर,२०२० रोजी पार पडणार आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि राज्यात गौहत्या बंदी कायदा आणणारे देवेंद्र फडणवीस, अभिनेते सुरेश ओबेरॉय, संगीत क्षेत्रात योगदान देणारे एस. पी. सेन, ग्रामीण क्षेत्रात देशी गोवंश संवर्धनासाठी प्रयत्न करणारे वैज्ञानिक डॉ. नवनाथ दुधाळ, वरिष्ठ पत्रकार अजय भट्टाचार्य, आरोग्य क्षेत्रातील सुरेखा सेनगुप्ता यांच्यासह खासगी सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात योगदान देणाऱ्या डॉ. बी. आर. कुमार अगरवाल यांचाही समावेश आहे. अगरवाल हे अनेक सामाजिक, व्यावसायिक आस्थापना तसेच संस्थांशी संबंधित आहेत. सेंट्रल असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्री, महाराष्ट्र (CAPSI)चे ते अध्यक्ष असून खासगी सुरक्षारक्षकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (SAI)चे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांना ‘हिंद गौरव सन्मान’सारख्या अनेक पुरस्कारांनी यापूर्वीही सन्मानित करण्यात आले आहे.