Join us

कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयात साकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पंचधातूंचा पुतळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 3:17 PM

कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती 11 फूटी पंचधातूंचा पुतळा व डोम साकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचे कांदिवली पश्चिम येथे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहे.

ठळक मुद्देकांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती 11 फूटी पंचधातूंचा पुतळा व डोम साकारला आहेडोममध्ये सुमारे 200 नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.राम नाईक यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारात येत्या 3 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे

मनोहर कुंभेजकर

मुंबई - कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती 11 फूटी पंचधातूंचा पुतळा व डोम साकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचे कांदिवली पश्चिम येथे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहे. मात्र येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यथोचित स्मारक उभारण्यात आले नव्हते.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना काही स्वयंसेवी संस्था मोफत जेवण उपलब्ध करून देत असतात. मात्र जेवायला बसण्याची गैरसोय असल्याने या नातेवाईकांना उभ्याने जेवण करावे लागते. रुग्णालय परिसरात आगामी तयार होणाऱ्या घुमटामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रछायेत रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टळणार आहे. या डोममध्ये सुमारे 200 नागरिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

महामानवाचा पुतळा सुसज्ज घुमटामध्ये बसवण्यासाठी खा. गोपाळ शेट्टी यांनी गेले कित्येक महिने पाठपुरावा केला होता. येथे महामानवाचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाशी एप्रिल 2017 पासून वारंवार बैठका तसेच महापालिका प्रशासकीय स्तरावर अथक प्रयत्न करून अखेर हा प्रस्ताव 2018 मध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला अशी माहिती त्यांनी दिली. ज्या महामानवाने आपल्या देशातील दलित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना बरोबरीचे स्थान देण्याचे मोलाचे कार्य केले त्यांना अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.      

पुतळ्याचे भूमिपूजन 4 नोव्हेंबर रोजी भाजपा अध्यक्ष अॅड.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले होते. तर आता या पुतळ्याचे लोकार्पण उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारात येत्या 3 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,  राज्य शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :मुंबईगोपाळ शेट्टीभाजपा