मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राजगृहावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'राजगृह'ला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी ही मागणी केली आणि ती मागणी तातडीनं मंजूर झाली, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
तत्पूर्वी, 'राजगृहावरील तोडफोड केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-
एक शरद, सगळे गारद... मग उद्धवजी पण गारद का?; संजय राऊतांना 'पॉवर'फुल टोला
'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध
राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले...