डॉ. बालाजी असेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार 

By संजय घावरे | Published: December 22, 2023 04:21 PM2023-12-22T16:21:26+5:302023-12-22T16:22:04+5:30

२४ डिसेंबर रोजी भाईंदर येथील उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

Dr. Balaji Asegaonkar got Keshavshrishti Award | डॉ. बालाजी असेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार 

डॉ. बालाजी असेगावकर यांना केशवसृष्टी पुरस्कार 

मुंबई - यंदाचा १४ वा केशवसृष्टी पुरस्कार संभाजी नगर येथील स्नेहसावली केअर सेटरचे संस्थापक डॉ. बालाजी असेगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. २४ डिसेंबर रोजी भाईंदर येथील उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. हेडगेवार इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे यांच्या हस्ते बालाजी असेगावकर यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. एक लाख रूपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना आसेगावकर यांनी आजारी आणि परावलंबी वयोवृद्धंची आबाळ बघून त्यांची विशेष काळजी घेणारे केंद्र सुरू करण्याचे ठरवले. डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने त्यांनी २०१८ मध्ये स्नेहसावली ही संस्था स्थापन केली. त्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेत त्यांनी संस्था नव्हे तर एक घरच उभे केले. स्नेहसावलीमध्ये आज सर्व वयाचे पीडित, ज्येष्ठ नागरिक, निराधार, परावलंबी, एकटे पडलेले दिव्यांग, निराश, हतबल मनोरुग्ण अशा सर्वांना मायेने शारीरिक आणि मानसिक उपचार दिले जातात. असेगावकर यांना काही वर्षापूर्वी एक गोष्ट निदर्शनास आली की, अनेक कुटुंबांत वडीलधारी मंडळींना दीर्घकाळ उपचार देण्याची वेळ येते, तेव्हा त्यांच्या नोकरी–व्यवसायामुळे कुटुंबीयांना घरात थांबून त्यांची सेवा करणे अशक्य होते. अशा रुग्णांवर स्ंनेहसावलीमध्ये उपचार केले जातात.

इथे मुख्यत: पॅरालिसिस, पेराप्लेजिया ,पार्किंसन्स, कोमा, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी , मतीमंदता, अल्झायमर या व्याधींनी किंवा इतर कुठल्याही कारणाने शरीरिकरीत्या अक्षम व्यक्तींवर उपचार केले जातात. संस्थेमध्ये रुग्णांची २४ तास संपूर्ण वैयक्तिक स्वच्छता, रोज डोक्टरांची, तपासणी, नर्सिंग केअर, पथ्यानुसार आहार, व्यायाम वगैरेंचा समावेश आहे, तसेच ऑक्सीजन सिलेंडर, नेब्युलायझर, सक्शन  मशीन  हयसारखे तातडीच्या वेळी लागणारी उपकरणेही आहेत. तसेच एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध आहे.

स्नेहसावलीचे सर्व पदाधिकारी हे  संभाजी नगर मधील प्रथितयश डॉक्टर्स असून सामाजिक कार्याच्या तळमळीमुळे  त्यांनी स्नेह सावली हा प्रकल्प सुरू केला. येथे जवळपास ४० टक्के रुग्ण हे मोफत किंवा सवलतीच्या दरात दाखल करून घेतले जातात.

Web Title: Dr. Balaji Asegaonkar got Keshavshrishti Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई