डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:32 AM2017-09-01T05:32:55+5:302017-09-01T05:33:29+5:30

बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी परिसरातील सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये आढळला.

Dr. The body of Deepak Amrapurkar was found | डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला

डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला

Next

मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी परिसरातील सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये आढळला.
एलफिन्स्टन येथे बुधवारी अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पाणी भरल्याने डॉ. अमरापूरकर यांनी गाडी सोडून पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ३६ तास ते बेपत्ता होते. त्यांच्या मृत्यूला पालिका जबाबदार
आहे. मॅनहोल उघडे ठेवणे हा गुन्हा
म्हणावा लागेल, असे इंंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. सुधीर पाटील म्हणाले.

डॉ. अमरापूरकर यांचे आजाराबाबतचे निदान योग्य असायचे. पटकन ते निदान करायचे. रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास होता. देशाच्या कानाकोपºयातून रुग्ण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये येत असत.
- डॉ. श्रीरंग बिच्चू, बॉम्बे रुग्णालय

Web Title: Dr. The body of Deepak Amrapurkar was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.