डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 09:35 PM2021-12-15T21:35:09+5:302021-12-15T21:35:35+5:30

श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते.

Dr. Death of Shriharsh Savarkar, son of Narayan Damodar Savarkar | डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

googlenewsNext

मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे आज १५ डिसेंबर २०२१ या दिवशी सायंकाळी ७.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. सावरकर कुटुंबातील जुन्या पिढीतील ते अखेरचे व्यक्ती होत. मुरबाड येथे ते रणजित सावरकर यांच्याजवळ राहात होते.

श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते. विक्रम सावरकर यांच्याबरोबर ते हिंदुमहासभेचीही काम करीत. गेल्या काही वर्षांपासून मुरबाड येथे सावरकर विक्रम सावरकर यांनी स्थापन केलेल्या आणि सध्या रणजित सावरकर चालवीत असलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरातील निवासस्थानी ते राहात होते.

Web Title: Dr. Death of Shriharsh Savarkar, son of Narayan Damodar Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.