Join us  

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 9:35 PM

श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते.

मुंबई : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे आज १५ डिसेंबर २०२१ या दिवशी सायंकाळी ७.४० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. सावरकर कुटुंबातील जुन्या पिढीतील ते अखेरचे व्यक्ती होत. मुरबाड येथे ते रणजित सावरकर यांच्याजवळ राहात होते.

श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते. विक्रम सावरकर यांच्याबरोबर ते हिंदुमहासभेचीही काम करीत. गेल्या काही वर्षांपासून मुरबाड येथे सावरकर विक्रम सावरकर यांनी स्थापन केलेल्या आणि सध्या रणजित सावरकर चालवीत असलेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या परिसरातील निवासस्थानी ते राहात होते.

टॅग्स :मृत्यूमुंबई