Join us

कोविड, एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॅा.दीपक सावंतांनी घेतली आरोग्य सचिवांची भेट

By मनोहर कुंभेजकर | Published: March 30, 2023 4:25 PM

महानगर पालिकांशी बैठका करून आढावा घेणे दररोज सुरू असल्याची माहिती एन. नवीन सोना यांना यावेळी दिली.

मुंबई-कोविड व एच३एन२ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आरोग्य सचिव  एन. नवीन सोना यांची  जी.टी. हॅास्पीटल येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण भागात रूग्ण  सापडू लागले आहेत. विशेषत: सांगली मिरज बुलढाणा व इतरत्र  रूग्ण संख्या वाढत आहे. आयसोलेशन बेडस आवश्यक आहेत, तसेच मुंबई , ठाणे येथेही रूग्ण संख्या वाढत आहे  दोन्ही महानगर पालिकांशी बैठका करून आढावा घेणे दररोज सुरू असल्याची माहिती एन. नवीन सोना यांना यावेळी दिली.

डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले की, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे , विशेषकरून मॅाल सिनेमाहॅाल व गर्दीच्या ठिकाणे येथे मास्क वापरण्याविषयी सूचना कराव्यात. हा ओमायक्रॅान व्हेरिएंट एक्सबीबी १.१५ हा व्हेरिएंट सध्या भारतात आहे. यावेळी व्हायरस म्युटेट झाला तर  होणारे परिणाम म्हणजेच लक्षणाच्या तीव्रतेवर लक्ष ठेवावे लागेल. असे ही अशी सूचना त्यांनी केली. 

जीनोम सिक्वेसिंगचे रिपोर्ट लवकर व्हावे तसेच लॅब इन्वेस्टीगेशनसाठी अव्वाच्या सव्वा पैसे पेशन्टला मोजावे लागतात. त्यामुळे  कॅप लावणे, कस्तुरबा सह इतर ठिकाणी इन्व्हेस्टी गेशन माफक दरात वमोफत होणे आवश्यक आहे. अशा सूचना त्यांनी केल्या. जनरल प्रक्टिशिनर्सनी ट्रीटमेंट प्रोटोकॅाल दिल्यास वेळेतच योग्य उपचार झाल्यास हॅास्पिटलायझेशन कमी होईल. तसेच ग्रामीण व निम शहरी भागात  खाजगी हॅास्पीटल रूग्णाना राखीव बेडस आरक्षित करून ठेवाव्यात या सूचनांचे सचिव सोनी यांनी स्वागत केल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :दीपक सावंतमुंबई