राज्याची कुचकामी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घ्यावा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 3, 2025 17:37 IST2025-04-03T17:37:05+5:302025-04-03T17:37:34+5:30
राज्याचे माजी आरोग्य मंत्री व कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॅा. दीपक सावंत यांना दुसरी डॉक्टरेट मिळाली आहे.

राज्याची कुचकामी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घ्यावा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई-राज्याचे माजी आरोग्य मंत्री व कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॅा. दीपक सावंत यांना दुसरी डॉक्टरेट मिळाली आहे.अभ्यासू नेता, डॉक्टर, आरोग्य मंत्री अश्या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजाला झाला.कोविड मध्ये त्यांनी रस्त्यावर फिरून गरजूंना मदतकेली. मोखाडा, मेळघाट,नंदुरबार,पालघर अश्या कुपोषण ग्रस्त भागात त्यांनी खूप काम केले,लोकांसाठी लढत राहिले,अनेक धाडसी निर्णय घेतले.ते धधाडीचे अभ्यासू डॉक्टर असून त्यांचे काम मी जवळून बघितले आहे.
त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशाला,राज्याला होईल. त्यामुळे राज्याची कुचकामी असलेली आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी "त्यांनी पुढाकार घेवून शासनाला मार्गदर्शन करावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केले.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन उपस्थित राहून डॉ. दीपक सावंत यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
तर काम करणारा डॉकटर कधी रिटायर होणार नाही.तुम्ही राजकीय चिंता करू नका, सर्व काही ठिक होईल. तुमच्या आरोग्याचा दीपक सतत तेवत राहो,तुमचे मार्गदर्शन राज्याला मिळत राहो असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरोना कालखंड आपल्या प्रत्येकाला काहीतरी शिकवून गेला. राजकीयदृष्टया अत्यंत अवघड असलेल्या या कालखंडात मंत्रीपदाच्या जबाबदारीतून सामना करताना समोर आलेल्या आव्हानांची माहिती त्यांनी त्यात दिली असून त्यांनी ही आव्हाने पेलण्यासाठी सुचवलेल्या उपायांचा नक्की अवलंब करू असेही याप्रसंगी नमूद केले.
डॉ.सावंत यांनी ‘सोशियो पोलिटिकल इम्पॅक्ट ऑफ कोव्हिड-१९ विथ रिस्पेक्ट ऑफ महाराष्ट्र’ या विषयावर अभ्यास करून सादर केलेल्या शोधप्रबंधासाठी त्यांना कोल्हापूर विद्यापीठाने डॉक्टरेट छत्रत्पती शिवाजी महाराज विद्यापीठातर्फे त्यांना दुसरी पी.एच.डी. प्रदान केली.त्याबद्धल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये डॉ.दीपक नामजोशी,डॉ.स्वप्नेश सावंत आणि नागपूरचे डॉ.पिनाक दंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता,त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर , गृहराज्यमंत्री योगेश कदम,गाईड डॉ.प्रकाश पवार आणि डॅा.सावंत यांचे हितचिंतक तसेच मित्रपरिवार उपस्थित होते.
डॉ.दीपक सावंत आपल्या प्रस्ताविकात म्हणाले की,एपिडेमिक अँनक्ट, डिझॅस्टर मॅनेजमेंट ॲक्ट इन्टरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन ॲक्ट सिव्हील अेव्हीएशन इंटर नॅशनल ॲक्ट यातील सुधारणा , जागतिक आरोग्य संघटनेचे चे बदलते धोरण त्यामुळे सुरूवातीच्या काळात झालेला गोंधळ , यावर भाष्य केले ,या पीएच डी प्रबंधाला युनो सारख्या आंतर राष्ट्रीय स्तरावर शासनाने न्यावे असे त्यांनी एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगितले.
मळम कोरोनाचे पुस्तक प्रसिद्ध केले,कोविड काळातील देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ लेख लोकमतने प्रसिद्ध केले.या प्रबंधात लोकमतचा देखिल मोलाचा सहभाग होता असे त्यांनी नमूद केले.
कोविडचा सोशल पॉलिटीकल परिणाम काय झाला यावर सखोल संशोधन केले.नियम बदलले गेले पाहिजे हे या पुस्तकात आहे.आंतरराष्ट्रीय कायदा ,सिव्हिल एव्हीएशनच्या कायदयात बदल केला पाहिजे.माझा आदर्श डॉ.श्रीकांत जिचकार होता.त्यांच्या पेक्षा एक डिग्री कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवाजी विद्यापीठाचे डॅा प्रकाश पवार म्हणाले की, पीएचडी करताना डॉ.दीपक सावंत यांना अनेक अडचणी आल्या,मात्र जिद्दीने त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका मनाली दीक्षित यांनी केले.