Join us  

गुगल डुडलवर झळकले डॉ. आंबेडकर

By admin | Published: April 15, 2015 2:01 AM

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने होमपेजवर विशेष डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४व्या जयंतीदिनी मंगळवारी गुगलने होमपेजवर विशेष डुडलच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.भारताचा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना गुगलने नेहमीच विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान दिला आहे. भारताचे राजकारण, समाजकारण एकूणच भारताच्या जडणघडणीत बाबासाहेबांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री असणारे बाबासाहेब घटना समितीच्या मसुदा समितीचेही अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९९०मध्ये मरणोत्तर ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाबासाहेबांचे कार्य, कर्तृत्व लक्षात घेऊनच गुगलने त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना डुडल समर्पित केले आहे. या डुडलविषयी महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवते यांनी गुगलकडे पाठपुरावा केला. गेल्या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला गुगलच्या मुंबई कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निवेदनही सादर केले. त्यानंतरही गुगलच्या अधिकाऱ्यांशी सतत बैठक घेऊन आपले म्हणणे मांडल्याचे रुपवते यांनी सांगितले. त्या वेळी गुगलने पुढच्या वर्षी डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र ठेवण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पंतप्रधानांकडून अभिवादनपंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीप्रीत्यर्थ अभिवादन. जयभीम. देशवासीयांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी स्वत:ला समर्पित केले पाहिजे. बाबासाहेब हे युगपुरुष होते. त्यांनी देशाची आणि देशवासीयांची अथक आणि नि:स्वार्थ भावनेने सेवा केली,’ असे मोदींनी संदेशात म्हटले आहे.