डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांना 'अमेरिकन अवॉर्ड्स ऑर्गनायझेशन'ने केले सन्मानित

By मनोहर कुंभेजकर | Published: September 21, 2023 07:17 PM2023-09-21T19:17:39+5:302023-09-21T19:17:48+5:30

या कलाकृतीला किमान एक ते अडीच वर्षे लागतात.

Dr. Mahalakshmi Wankhedkar was honored by American Awards Organization | डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांना 'अमेरिकन अवॉर्ड्स ऑर्गनायझेशन'ने केले सन्मानित

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांना 'अमेरिकन अवॉर्ड्स ऑर्गनायझेशन'ने केले सन्मानित

googlenewsNext

मुंबई - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर या शास्त्रज्ञ आणि कलाकार आहेत. एक कलाकार म्हणून त्यांचे नाव 2016 मध्ये "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये लहान आणि सूक्ष्म कात्रण कागद कला या साठी नोंदवले गेले आहे. त्या गेली 32 वर्षे कागद कात्रणातील दुर्मिळ आणि वास्तववादी पक्षी बनवत आहेत . या कलाकृतीला किमान एक ते अडीच वर्षे लागतात. या प्रकारची कलाकृती तयार करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत. त्यांनी भारतात आणि परदेशात 7 प्रदर्शने भरवली आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्या भारतीय कला आणि संस्कृतीचा अभ्यास करत असून त्या आयुर्वेद, विविध उपचार आणि निसर्गाचे सखोल संशोधन करतात. 

"नेचर वेदा" मध्ये त्यांनी पीएचडी केली आहे.भारत सरकारकडून त्यांना 3 पेटंट मिळाले.आता त्यांची संकल्पना आहे पर्यावरण पूरक सौंदर्यकरण ही त्यांची संकल्पना असून त्यांनी त्याचे प्रकल्प महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत. त्या या प्रकल्पांवर काम करीत असून सर्व प्राणिमात्रांचे जीवन शांतीमय करणे हे त्यांचे ध्येय आहे.

"अमेरिकन पुरस्कार संस्था" त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अपवादात्मक गुणवत्ता आणि कौशल्ये असलेल्या मान्यवरांचा सन्मान करतात. यावर्षीचा तो सन्मान भारतातील डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांना मिळालेला असून “न्यूयॉर्क डेली” मध्ये पुरस्कार विजेत्या म्हणून त्यांचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या वैज्ञानिक कलाकार असून जगाशी मैत्रिद्वारे पर्यावरणपूरक प्रकल्प राबवल्याबद्धल डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांना  युनायटेड रिसर्च कौन्सिलने  अमेरिकन उत्कृष्ट शास्त्रज्ञ आणि कलाकार पुरस्कार दिला आहे.

Web Title: Dr. Mahalakshmi Wankhedkar was honored by American Awards Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई