Join us

डॉ. मनोहर जोशी यांना 'डी. लिट' पदवी प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 11:14 IST

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांना आज सन्मान करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांना आज सन्मान करण्यात आला आहे. मनोहर जोशी यांना डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे 'डी. लिट' या पदवी प्रदान करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी स्वतः भेट घेऊन ही पदवी डॉ. जोशी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. 

राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी डी. लिट ही पदवी दिली जाते. डॉ. जोशींनीही सामाजिक कार्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच मनोहर जोशींचा या पदवीनं सन्मान करण्यात आला आहे. "जीवनात मी शिक्षणाला खूप महत्त्व दिले, त्याची या विद्यापीठाने दखल घेतल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो; तसेच डी. वाय. पाटील यांच्यासारख्या शिक्षणसम्राटांच्या हस्ते ही पदवी प्रदान होणं हे माझं भाग्य आहे."  या शब्दांत डॉ. जोशी यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. पदवी प्रदान प्रसंगी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. शिरीष पाटील व डॉ. जोशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते