डॉ. दीपक सावंतांना मंत्रीपदाचा दर्जा; कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष
By मनोहर कुंभेजकर | Published: August 10, 2023 03:52 PM2023-08-10T15:52:45+5:302023-08-10T15:53:17+5:30
या टास्क फोर्सची पहिली बैठक सयाद्री अतिथीगृहात पार पडेल. या टास्क फोर्समुळे आदिवासी ग्रामीण भागात कुपोषण कमी कसे होईल
मुंबई - राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुपोषण निर्मूलन माता बालमृत्यू कमी व्हावेत यासाठी तयार केलेल्या टास्क फोर्सच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. २०जून २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांनी सदर टास्क फोर्स गठीत केला असून यात गृह, महिला व बाल विकास, आरोग्य, कृषि, एकात्मिक बाल विकास आयुक्त व इतर विभागांचा समावेश केला आहे. आता ४ ऑगस्टच्या जीआरनुसार सावंत यांना शासनाच्या मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे.
या टास्क फोर्सची पहिली बैठक सयाद्री अतिथीगृहात पार पडेल. या टास्क फोर्समुळे आदिवासी ग्रामीण भागात कुपोषण कमी कसे होईल, जन्माला येणारी बाळे कुपोषित होऊ नये म्हणून करावयाच्या उपाय योजना, गर्भारपणातील आहार वैद्यकीय तपासणी यांचे नियोजन, जन्मत: व्यंग असणारे मूल कुपोषित बालकाची संख्या कमी करणे, सॅम व मॅमच्या वजनात वाढ करून त्यांना सर्वसाधारण गटात आणणे हे उद्दीष्ट असेल, अशी माहिती डॅा दीपक सावंत यांनी लोकमतला दिली.
दरम्यान, गेल्या महिनाभरात पालघर दोन वेळा, एकवेळा मेळघाट असे तीन दौरे केल्याचेही त्यांनी सांगितले.