विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:45 PM2020-09-08T12:45:43+5:302020-09-08T13:09:53+5:30
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाचे उमेदवार भाई गिरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपाने ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांना उमेदवारी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले निलम गोऱ्हे यांचे अभिनंदन
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिले आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली
असून, त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असेही मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करतांना म्हणाले.
तर महत्त्वाच्या बातम्या