डॉ. होमी भाभा विद्यापीठ पदवी प्रवेशासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:03 AM2019-05-30T06:03:46+5:302019-05-30T06:03:49+5:30
राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र शासनाने राज्यात नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली.
मुंबई : राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र शासनाने राज्यात नव्याने स्थापन केलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली. या विद्यापीठात शासकीय विज्ञान संस्था मुंबई हे प्रमुख महाविद्यालय आणि घटक महाविद्यालये म्हणून एलफिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय, मुंबई यांचा समावेश आहे.
एल्फिन्स्टन आणि सिडनहॅम महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. एल्फिन्स्टन महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएस्सी (आयटी) बीएस्सी (बायोटेक) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सिडनहॅम महाविद्यालयात बीकॉम, बीएमएस, बीबीआय आणि पदव्युत्तरसाठी एमकॉम (अकाउंट अँड बँकिंग अँड फायनान्स) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासकीय विज्ञान संस्था आणि शासकीय अध्यापक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षाद्वारे राबविली जाणार असल्याने, या दोन्ही महाविद्यालयांचा समावेश या प्रवेश प्रक्रियेत नसल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
>पदवीच्या जागांत
होणार वाढ
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया महाविद्यालयांच्या संख्येत २२ ने वाढ झाल्याने यंदा जागा वाढणार आहेत. नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव नुकतेच शासनाकडे पाठविण्यात आले असून, त्यांना लवकरच मान्यता मिळून येत्या शैक्षणिक वर्षांत या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे शक्य होणार आहे. यामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच काही स्वयं-अर्थसहाय्यित अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत.
>उपलब्ध जागा
एल्फिन्स्टन महाविद्यालय
बीए - १२०
बीकॉम - २४०
बीएस्सी - १२०
बीएस्सी (आयटी) - ६०,
बीएस्सी बायोटेक - ४०
सिडनहॅम महाविद्यालय
बीकॉम - ६००
बीएमएस - १२०
बीबीआय - १२०
एमकॉम (अकाउंट अँड बँकिंग अँड फायनान्स) - २४०