Join us

बोरिवली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक बनलाय भिकरी गर्दुल्यांचा अड्डा

By मनोहर कुंभेजकर | Published: June 17, 2024 7:52 PM

मुंबई -बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पूलाच्या खाली  असलेला डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक हा जणू ...

मुंबई-बोरीवली पूर्व व पश्चिम यांना जोडणारा जन करिअप्पा उड्डाण पूलाच्या खाली  असलेला डॉ.शामा प्रसाद मुखर्जी चौक हा जणू भिकरी गर्दुल्ले यांचा अड्डा बनला आहे.

पालिकेने येथे रंगरंगोटी करून तथाकथीत वाचनालय सारखी वास्तू उभी केली आहे. सध्या येथील  जागेचा गैरवापर होत असून तेथे फक्त भिकारी, गर्दुल्ले यांच्या झोपण्याची सोय म्हणून होत आहे. सकाळचे प्रातर्विधी  हे लोक येथेच उरकत असल्याने प्रचंड घाण व कच-याचे साम्राज्य या शिवाय तेथील वापर शून्य आहे. आमजनतेच्या करा मार्फत येणाऱ्या पैशाचा अपव्यय मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभागातर्फे  सुरू आहे.

भिकारी, गर्दुल्ले यांच्या वास्तव्याने हा परिसर अस्वच्छ व असुरक्षित झाला असून याला मुंबई महापालिका व स्थानिक पोलिस जबाबदार नाहीत का ?  सदर वास्तूबांधण्याचे नक्की प्रयोजन काय?असा सवाल बोरिवली भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर परांजपे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्वरित कारवाई न झाल्यास भाजपा तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :मुंबई