Join us  

‘डॉ. सुभाषचंद्र शो’च्या दुसऱ्या पर्वाला प्रारंभ...!

By admin | Published: May 05, 2017 5:06 AM

देशातील युवकांना प्रेरणा देणारा ‘शो’ म्हणून ओळख असलेल्या ‘डॉ. सुभाषचंद्र शो’च्या दुसऱ्या पर्वाला आता सुरुवात होत

मुंबई : देशातील युवकांना प्रेरणा देणारा ‘शो’ म्हणून ओळख असलेल्या ‘डॉ. सुभाषचंद्र शो’च्या दुसऱ्या पर्वाला आता सुरुवात होत आहे. या ‘शो’चे सर्वेसर्वा असलेले राज्यसभेचे खासदार आणि एस्सेल, तसेच झी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र यांच्या या ‘शो’चा पडदा (कर्टन रेझर) येत्या ६ मे रोजी उघडणार आहे. त्यानंतर १३ मे रोजी झी मीडियाच्या वाहिन्यांवर या ‘शो’चा पहिला भाग प्रसारित होणार आहे.‘डॉ. सुभाषचंद्र शो’चे पहिले पर्व दिल्ली येथे पार पडले होते आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवात मुंबईतून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आणि प्रल्हाद कक्कड स्कूल आॅफ ब्रॅण्डिंग अ‍ॅण्ड एन्त्रेप्रेन्यूअरशिपच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या ‘शो’च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘थायरोकेअर’चे अध्यक्ष डॉ. ए.वेलूमणी, तसेच ‘डोअर स्टेप स्कूल’च्या संचालिका बीना सेठ लष्करी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या अंतर्गत; एमबीए विरुद्ध एन्त्रेप्रेन्यूअरशिप, रचनात्मक उद्योगातील उद्यमशीलता आदी विषयांवर यावेळी विवेचन करण्यात आले.सक्षम अर्थव्यवस्था आणि विकासासाठी एन्त्रेप्रेन्यूअर आणि एमबीए अशा दोघांची आवशक्यता असते. या दोन्ही गोष्टी व्यवस्थेची महत्त्वाची अंगे आहेत. योग्य मार्ग निवडून सफलतेच्या दिशेने मार्गक्रमण करणे हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते, असे भाष्य डॉ. सुभाषचंद्र यांनी या ‘शो’च्या निमित्ताने बोलताना केले.