मुंबई - वैद्यकीय सेवा करणाऱ्या मुंबईतील आघाडीच्या कुटुंबांपैकी एक म्हणजे तळवलकर कुटुंबीय. या समृद्ध वैद्यकीय कुटुंबातील एक अग्रणी नाव म्हणजे स्वर्गीय डॉ. नीळकंठ तळवलकर (एन.जी. तळवलकर) हे आहे. आज एन.जी. तळवलकर यांची जन्मशताब्दी साजरी झाली.
एन.जी. तळवलकर यांचा जन्म दि. ५ ऑगस्ट, १९१८ रोजी झाला होता. तळवलकरांच्या कुठलाही खंड न पडता सलग सात पिढ्या अगदी आजही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत ही विशेष बाब आहे. डॉ. नीळकंठ तळवलकर मुंबईतील मधुमेह तज्ज्ञ म्हणून सुप्रसिद्ध होतेच, पण या क्षेत्रात अत्यंत आदराने त्यांचे नाव घेतले जात. मुंबईमधील रहेजा हॉस्पिटलचे डॉ. तळवलकर हे प्रमुख प्रवर्तक होते.