LMOTY 2022: नवजात शिशूंचा जीव वाचवणाऱ्या डॉ. ऋषीकेश ठाकरेंचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:12 PM2022-10-11T22:12:52+5:302022-10-11T22:14:19+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: ५ हजारांवर शिशूंना गेल्या दोन दशकात आपल्या उपचारातून नवीन आयुष्य देण्याचे काम औरंगाबादेतील नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश ठाकरे यांनी केले आहे. ऋषिकेश ठाकरे यांच्या याच कामाचा गौरव हा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने करण्यात येणार आहे. 

Dr. who saved the lives of newborns. Rishikesh Thackeray honored with 'Lokmat Maharashtrian of the Year' award | LMOTY 2022: नवजात शिशूंचा जीव वाचवणाऱ्या डॉ. ऋषीकेश ठाकरेंचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान

LMOTY 2022: नवजात शिशूंचा जीव वाचवणाऱ्या डॉ. ऋषीकेश ठाकरेंचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान

Next

जन्मानंतर विविध गुंतागुंत परिस्थितीमुळे नवजात शिशूंचा जीव धोक्यात येतो. अशावेळी त्या शिशूच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबासाठी कठीण प्रसंग असतो. अशाच ५ हजारांवर शिशूंना गेल्या दोन दशकात आपल्या उपचारातून नवीन आयुष्य देण्याचे काम औरंगाबादेतील नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश ठाकरे यांनी केले आहे. ऋषिकेश ठाकरे यांच्या याच कामाचा गौरव हा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मंगळवारी मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. यामध्ये लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या पुरस्कारानं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. यंदा डॉ. ऋषिकेश ठाकरे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. ठाकरे यांनी मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा भागात प्रथमच अत्याधुनिक ‘एनआयसीयू’ची स्थापना केली. संचालक आणि प्रमुख म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ सर्वसमावेशक नवजात बालकांची काळजी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सेवा आणि फॉलोअप केअर प्रदान केले.

वर्षाला जवळपास ३०० ते ४०० नवजात शिशू उपचारासाठी दाखल होतात. बाह्यरुग्ण विभागातही अनेक नवजात शिशूंवर उपचार करतात. डॉ. ठाकरे यांना शिकवण्याची आणि प्रशिक्षणाची आवड आहे. त्यांनी संसाधन व्यक्ती म्हणून काम केले आहे. अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. वैद्यकीय परिषदा आणि डॉक्टर, पदव्युत्तर, फेलो, परिचारिका आणि बालरोगतज्ज्ञांसाठी ज्ञानाचा प्रसार, जागरूकता, कौशल्य निर्माण आणि क्लिनिकल समस्या सोडवणे यामध्ये त्यांचा सहभाग आहे.

डॉ. ठाकरे यांनी स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय सरकारी संस्थांशी संपर्क साधला आणि जिल्ह्यात नवजात शिशू सुरक्षा कार्यक्रम (ठररङ) आणि सुविधा आधारित नवजात बालकांची काळजी लागू करण्यात त्यांनी हातभार लावला. डॉ. ठाकरे विविध नवजात शिशू काळजी मॉड्यूल्ससाठी सामग्री निर्मिती, अभ्यासक्रम विकास आणि प्रसारामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी विविध समित्यांमध्ये तज्ज्ञ आणि तांत्रिक सदस्य म्हणून काम केले आहे. सहा पुस्तकांचे ते संपादक आहेत.

Web Title: Dr. who saved the lives of newborns. Rishikesh Thackeray honored with 'Lokmat Maharashtrian of the Year' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.