डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम केव्हा पूर्ण होणार?, धनंजय मुंडे यांनी केली घोषणा!
By मोरेश्वर येरम | Published: December 6, 2020 12:16 PM2020-12-06T12:16:03+5:302020-12-06T12:23:53+5:30
१४ एप्रिल २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्माकाराचं लोकार्पण होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मुंबई
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. १४ एप्रिल २०२३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्माकाराचं लोकार्पण होईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मान्यवरांनी दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी आयोजित शासकीय कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आंबेडकर स्मारकाबाबतची घोषणा केली.
इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेऊन आहे. एप्रिल २०२३ पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 6, 2020
(2/2)
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरही आंबेडकर स्माराकाबाबतची माहिती दिली आहे. "इंदूमिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून राज्य शासन त्याकडे दैनंदिन पद्धतीने लक्ष ठेवून आहे. एप्रिल २०२३ पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आमच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील", असं धनजंय मुंडे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांचेही महामानवाला अभिवादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्तचा शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते.