‘डीआरए’चे सहसंचालक समीर वानखेडे यांना लामखडे पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:12 AM2019-05-26T06:12:34+5:302019-05-26T06:12:41+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दिल्या जाणा-या जमादार बापू लक्ष्मण लामखडे पुरस्कार महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरए) सहसंचालक समीर वानखेडे यांना वितरित करण्यात आला आहे.
मुंबई : ठाण्यातील आसरा समूहाच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी दिल्या जाणा-या जमादार बापू लक्ष्मण लामखडे पुरस्कार महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरए) सहसंचालक समीर वानखेडे यांना वितरित करण्यात आला आहे. शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना या वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो. शुक्रवारी या पुरस्काराचा वितरण सोहळा ठाण्यात पार पडला.
भारतीय कस्टमचे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या ४० व्या पुण्यतिथीच्या औचित्याने या पुरस्काराचे वितरण त्यांचे सहकारी व ज्येष्ठ अधिकारी कमर काझी यांच्या हस्ते करण्यात आले. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असून त्यांनी भारतीय महसूल सेवेंतर्गत विविध पदांवर जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मार्च महिन्यात त्यांनी २०० किलो सोने जप्त करीत तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले.