मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा भुयारी मार्गातून?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:59 PM2023-10-18T18:59:32+5:302023-10-18T18:59:50+5:30
मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
मुंबईतील वाहतूककोंडी दूर करण्याच्या दृष्टीने विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधण्याच्या योजनेला मूर्त स्वरुप देण्यासाठी मुंबई महापालिका आखणी करीत आहे. या भुयारी मार्गाचा वापर पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीही करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. आयुक्तांनी आठ सदस्यांची समितीही स्थापन केली आहे. ही समिती सर्व आढावा घेणार आहे.
भरती-ओहोटीचाही होणार विचार
- या भुयारी मार्गाचा पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो का? असा एक नवा पैलू समोर आला आहे.
- अतिवृष्टी झाल्यास आणि त्याच वेळी समुद्राला भरु सुरू असल्यास पाण्याचा निचरा होण्यात बराच अडथळा निर्माण होतो.
- पावसाचे पाणी भुयारी मार्गातून अन्यत्र वळविता येईल का? याविषयी विचार सुरू आहे.