गटार, पायवाटांची कामे दरवर्षी प्रभागात सुरू

By admin | Published: February 27, 2015 10:32 PM2015-02-27T22:32:57+5:302015-02-27T22:32:57+5:30

एकीकडे पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव पालिकेने बासनात गुंडाळले आहेत. काही प्रस्तावांवरील निधी शून्यावर आणला आहे

Drains, trails, work every year | गटार, पायवाटांची कामे दरवर्षी प्रभागात सुरू

गटार, पायवाटांची कामे दरवर्षी प्रभागात सुरू

Next

ठाणे : एकीकडे पालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने अनेक महत्त्वाचे प्रस्ताव पालिकेने बासनात गुंडाळले आहेत. काही प्रस्तावांवरील निधी शून्यावर आणला आहे. परंतु, असे असताना दुसरीकडे शहरातील काही प्रभागांत दरवर्षी गटार, पायवाटांची तीच-तीच कामे केली जात आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाण्यातील एका दक्ष नागरिकाने पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरातील विविध प्रभागांत गटार व पायवाटांसाठी दरवर्षी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोट्यवधींची तरतूद केली जाते. त्यानुसार, प्रत्येक प्रभागात ही कामे सुरू असतात. मात्र, प्रत्येक प्रभागात दरवर्षी किती कामे होतात, ती कामे पुन:पुन्हा होतात का, आदींचे कोणतेही रेकॉर्ड ठेवण्यात येत नाही. त्यामुळे दरवर्षी तीच-तीच कामे नव्याने प्रभागात होत असतात. (प्रतिनिधी)

Web Title: Drains, trails, work every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.