राज्यात दैनंदिन रुग्णांत कमालीची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:50+5:302021-06-01T04:06:50+5:30
मुंबई : राज्यात मे महिन्याच्या अखेरीस दैनंदिन रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. राज्यात दिवसभरात १५ हजार ७७ ...
मुंबई : राज्यात मे महिन्याच्या अखेरीस दैनंदिन रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसून आली. राज्यात दिवसभरात १५ हजार ७७ रुग्ण आणि १८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सोमवारी ३३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ५३ लाख ९५ हजार ३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या २ लाख ५३ हजार ३६७ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८८ टक्के असून, मृत्यूदर १.६६ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५० लाख ५५ हजार ५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.३९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १८ लाख ७० हजार ३०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १० हजार ७४३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ४६ हजार ८९२ असून मृतांचा आकडा ९५ हजार ३४४ आहे. दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या १८४ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५१ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या १८४ मृत्यूंमध्ये मुंबई २९, नवी मुंबई मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा १, रायगड ९, पनवेल मनपा ४, नाशिक ३, नाशिक मनपा ६, अहमदनगर १५, जळगाव ५, जळगाव मनपा २, पुणे ४, पुणे मनपा ५, सोलापूर १२, सोलापूर मनपा १, सातारा ११, कोल्हापूर १२, कोल्हापूर मनपा १ सांगली ५, सिंधुदुर्ग ८, रत्नागिरी २, परभणी ४, लातूर १४, लातूर मनपा २, अकोला ३, अमरावती ३, यवतमाळ १, बुलढाणा ३, नागपूर मनपा ३, गोंदिया ८. चंद्रपूर मनपा २ इ. रुग्णांचा समावेश आहे.
राज्य
आजचा मृत्यूदर १.६६
आजचे मृत्यू १८४
आजचे रुग्ण १५०७७
सक्रिय रुग्ण २,५३,३६७
मुंबई
आजचा मृत्यूदर ४.३
आजचे मृत्यू २९
आजचे रुग्ण ६६६
सक्रिय रुग्ण २४८५०