दुर्वेस-सावरे रस्त्याला मलमपट्टी

By admin | Published: May 2, 2015 10:54 PM2015-05-02T22:54:48+5:302015-05-02T22:54:48+5:30

दुर्वेस-सावरे रस्त्याचे थातूरमातूर काम करून प्रशासन मोकळे झाले आहे. येणारा पावसाळा सुद्धा हा रस्ता काढेल की नाही, याबाबत नागरिकांत शंका आहे.

Drauves-Savvy Road bandage | दुर्वेस-सावरे रस्त्याला मलमपट्टी

दुर्वेस-सावरे रस्त्याला मलमपट्टी

Next

मनोर : दुर्वेस-सावरे रस्त्याचे थातूरमातूर काम करून प्रशासन मोकळे झाले आहे. येणारा पावसाळा सुद्धा हा रस्ता काढेल की नाही, याबाबत नागरिकांत शंका आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दखल घेतली. मात्र काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे.
आदिवासी गावांसाठी रस्ता बनविण्यासाठी शासनाकडून प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये निधी दिला जातो. मात्र बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने बहुतांश रस्त्यांचे तिनतेरा वाजले आहे.
दुर्वेस ते सावरेपर्यंतचा रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात सरपंच रामू बरफ तसेच उपसरपंचांनी तक्रार केली. मात्र तक्रारीला केराची टोपली दाखविली. वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागांने रस्त्यांचे काम सुरु केले. मात्र कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Drauves-Savvy Road bandage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.