आकृती पेनाने काढा वा पेन्सीलने... गुण मिळणार; दहावीच्या भाषा विषयाविषयीचा गोंधळ दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 07:43 AM2024-02-23T07:43:21+5:302024-02-23T07:44:45+5:30

राज्य शिक्षण मंडळात मराठी विषयाकरिता मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी याबाबत मंडळाला पत्र लिहून हा गोंधळ दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने गुणांबाबतची संदिग्धता दूर केली जाईल, असे शेख यांना कळविले.

Draw the figure with a pen or a pencil... will get points; Clear the confusion about 10th language subject | आकृती पेनाने काढा वा पेन्सीलने... गुण मिळणार; दहावीच्या भाषा विषयाविषयीचा गोंधळ दूर

आकृती पेनाने काढा वा पेन्सीलने... गुण मिळणार; दहावीच्या भाषा विषयाविषयीचा गोंधळ दूर

मुंबई : दहावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषा विषयांमध्ये परिच्छेदावर आधारित आकलन कृती, आकृत्या पेनाऐवजी पेन्सीलने काढल्या म्हणून विद्यार्थ्यांचे गुण कापू नयेत, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

राज्य शिक्षण मंडळात मराठी विषयाकरिता मॉडरेटर म्हणून काम करणारे नफीस शेख यांनी याबाबत मंडळाला पत्र लिहून हा गोंधळ दूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने गुणांबाबतची संदिग्धता दूर केली जाईल, असे शेख यांना कळविले.

सर्व नियामकांना सूचना

त्याबाबत सर्व भाषा विषयांच्या नियामक सभेत सर्व नियामकांना सूचना देण्यात येणार आहेत. नियामक आपापल्या परीक्षकांना सूचना देतील. विद्यार्थ्यांनी पेन किंवा पेन्सीलने आकलन कृती आकृती काढल्यास उत्तर बरोबर असल्यास पूर्ण गुण द्यावेत. केवळ पेन्सीलने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापू नये, अशा सूचना देण्यात येतील, असे मंडळाने शेख यांना कळविले आहे.

नेमका काय होता घोळ?

पेपर तपासणारे शिक्षक पेनाने आकृती काढली म्हणून अर्धा गुण कापतात. त्यांनी नाही कापला तर कित्येकदा मॉडरेटरच्या स्तरावर अर्धा गुण कापला जातो.

आकृती पेनाने काढावी, अशी सूचना प्रश्नपत्रिकेत आहे. मात्र, पेन्सीलने आकृती काढलेली असल्यास अर्धा गुण कापावा, अशा सूचना नाहीत. मग, हे गुण का कापले जातात, असा प्रश्न काही पर्यवेक्षक, मॉडरेटर करीत होते. या संदिग्धतेमुळे विद्यार्थ्यांचे विनाकारण नुकसान होते.

Web Title: Draw the figure with a pen or a pencil... will get points; Clear the confusion about 10th language subject

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा