मुंबई : मुंबईकरांचे गेटवे आॅफ इंडिया येथे जहाजावरील तरंगत्या हॉटेलचे स्वप्न तूर्तास तरी लांबणीवर पडले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टकडून गेटवे आॅफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी येथील किनाऱ्यांवर तरंगते हॉटेल सुरू करण्यात येणार होते. मात्र, संबंधित कंपन्यांनी काही तांत्रिक कारणास्तव या कामासाठी २ महिन्यांची मुदतवाढ मिळावी, असा विनंती अर्ज केला होता. या अर्जाला मुंबई पोर्ट ट्रस्टने मंजुरी दिल्याने तूर्तास तरी गेटवे आॅफ इंडिया आणि गिरगाव चौपाटी येथे तरंगते हॉटेल सुरू होण्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.जानेवारी महिन्यात १२५ प्रवासी क्षमता असलेली दोन जहाजे मुंबईच्या किनाºयावर दाखल झाली आहेत. विदेशी बनावटीची ही जहाजे आहेत. सध्या जहाजाच्या आत रेस्टॉरंटसंबंधीचे आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे. जहाजामधील तरंगत्या हॉटेलसाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. जहाजातील अंतर्गत काम पूर्ण झाल्यावर मुंबईकरांसह विदेशी पर्यटकांसाठी तरंगते हॉटेल खुले होणार आहे, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.मुंबई पोर्ट ट्रस्टच्या शहर आणि सागरी किनारा यांच्या विकासातील २७ प्रकल्पांपैकी तरंगते हॉटेल हा एक प्रकल्प आहे. धकाधकीच्या जीवनात उसळत्या लाटांसह सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईच्या सागरी किनाºयावर तरंगत्याहॉटेलची कल्पना उदयास आली. शहरातील पश्चिम किनाºयावर वांद्रे जेट्टी येथे दोनतरंगती हॉटेल्स सुरू करण्यात आली आहेत,तर पूर्व किनाºयावर मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे२ तरंगत्या हॉटेल्सना मंजुरी देण्यात आली आहे.मात्र, हे काम हाती घेतलेल्या संबंधित कंपन्यांनी काही तांत्रिक कारणास्तव या कामासाठी २ महिन्यांची मुदतवाढ घेतल्याने मुंबईकरांचे तरंगत्या हॉटेलचे स्वप्न तूर्तास लांबणीवर पडले आहे.
तरंगत्या हॉटेलचे स्वप्न लांबणीवर पडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 2:08 AM