जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी ड्रेसकोड

By admin | Published: May 18, 2017 02:55 AM2017-05-18T02:55:49+5:302017-05-18T02:55:49+5:30

यंदा झालेल्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘ड्रेसकोड’ जाहीर करण्यात आला होता. आता २१ मे रोजी होणाऱ्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेसाठीदेखील आयआयटीने ‘ड्रेसकोड

Dress code for JEE advanced test | जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी ड्रेसकोड

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी ड्रेसकोड

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा झालेल्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ‘ड्रेसकोड’ जाहीर करण्यात आला होता. आता २१ मे रोजी होणाऱ्या ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेसाठीदेखील आयआयटीने ‘ड्रेसकोड’ जाहीर केला असून, कॉपी प्रकरणांना आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला सुमारे १ लाख ७ हजार विद्यार्थी बसणार आहेत; पण परीक्षा हॉलमध्ये कॉपीचे प्रकार घडू नयेत, म्हणून यंदा ‘ड्रेसकोड’ची यादी आयआयटीने जाहीर केली आहे. त्यानुसार परीक्षेला येताना विद्यार्थिनींना गळ््यातील हार, अंगठी, बांगड्या, लॉकेट्स, कानातले, चमकी, हेअर पिन, हेअर बॅण्ड घालण्यास मनाई आहे. तर विद्यार्थ्यांना बूट, फूल स्लिव्ह शर्ट घालण्यास बंदी आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट वॉच, लॅपटॉप, वायफाय डिवाइस, हॅण्ड बॅण्ड, मोठे बटण असलेले कपडे यालाही बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षीही जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना पॅड, घड्याळ, लांब बाह्यांचे कपडे अशा गोष्टींना बंदी घालण्यात आली होती.

Web Title: Dress code for JEE advanced test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.