DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 12:25 PM2021-10-08T12:25:20+5:302021-10-08T12:30:26+5:30

इराणमधून शेंगादाणा तेलाच्या खेपेमध्ये लपवून ही ड्रग्स मुंबईत आणली होती.

DRI's major operation, heroin worth Rs 125 crore seized at Mumbai port; Accused arrested | DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत

DRIची मोठी कारवाई, मुंबईत इराणमधून आलेले 125 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त; आरोपी अटकेत

Next

मुंबई:मुंबईत एकीकडे क्रुझ पार्टीमध्ये आढळलेल्या ड्रग्स प्रकरणाचा गोंधळ सुरू असताना, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(DRI) टीमला मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर 25 किलो हेरॉईन सापडल्याची माहिती समोर आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकान छापा मारला असता, बंदरातील एका कंटेनरमधून हे ड्रग्स जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 125 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील 62 वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. शांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेमध्ये हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावर मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणला जात आहे. या माहितीच्या आधारे आम्ही छापा मारला आणि ही कारवाई केली.

कंटेनर ऑर्डर करणाऱ्याचीही फसवणूक झाली

डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंटेनर वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी आयात केलं होतं. डीआरआय टीमने त्याचीही चौकशी केली. चौकशीदरम्यान, ठक्करने डीआरआयला सांगितले की, संघवीने त्याला त्याच्या फर्मच्या आयईसीमध्ये इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी 10,000 रुपये प्रति माल पाठवण्याची ऑफर दिली होती. तो 15 वर्षांपासून संघवीसोबत व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून हा माल आणण्याची परवानगी दिली. ठक्करलाही यात ड्रग्स आणत असल्याची माहिती नव्हती.

आरोपी डीआरआयच्या ताब्यात

डीआरआयने सांघवीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 11 ऑक्टोबरपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे. शांघवीच्या अटकेनंतर, आता डीआरआय टीम आज सकाळपासून मुंबई बंदरावर उपस्थित असलेल्या इतर काही कंटेनरचा शोध घेत आहे.

Web Title: DRI's major operation, heroin worth Rs 125 crore seized at Mumbai port; Accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.