Join us

आईला धक्का लागल्याने मुलाकडून चालकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 08:06 IST

मुंबई : आईला कारच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागात चालकाची हा हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री शिवाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ...

मुंबई : आईला कारच्या गाडीचा धक्का लागल्याच्या रागात चालकाची हा हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री शिवाजीनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे. या मारहाणीत आदिल तालीम खान (३८) याचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी अब्दुल करीम शेख ऊर्फ दादू, मोहम्मद शरीफ अब्बास अली शेख ऊर्फ पप्पू याला अटक केली आहे. खान यांची पत्नी शबिना आदिल खान (३४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. शेखच्या आईला खान यांच्या गाडीचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला. पुढे याच रागात आरोपींनी खान यांचे घर गाठून त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस