कारचालकाला बजावला हेल्मेट न घातल्याचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:01 AM2020-06-22T05:01:43+5:302020-06-22T05:01:47+5:30
मुंबई पोलिसांनी कारचे मालक असलेल्या व्यक्तीला हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला आहे.
मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण मुंबई पोलिसांनी कारचे मालक असलेल्या व्यक्तीला हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला आहे.
याबाबत चिराग संगानी म्हणाले की, मी कारचा मालक आहे, परंतु हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्याचा दंड वाहतूक पोलिसांनी आकारला आहे. मला आकारलेला ५०० रुपयांचा दंड चुकीचा असून ते चलन काढण्यात यावे. दरम्यान, संगानी यांनी कार आणि दुचाकी यांचा फोटो टिष्ट्वट केला असून त्यामध्ये दुचाकीच्या नंबर प्लेटवर केवळ चार आकडे दिसत आहेत. त्याची नोंदणी कोणत्या आरटीओ विभागात केली हे समजत नाही.
तर आरटीओ कार्यालयात गाडीची नोंदणी करताना, कधी कधी व्यक्ती मोबाइल क्रमांक पोर्ट करतात, जुनी गाडी एका व्यक्तीच्या नावे असते, दुसरा चालवतो. काही वेळा जाणीवपूर्वक व्यक्ती दुसºयाच्या मोबाइल क्रमांकावर गाडीची नोंदणी करतात. त्यामुळे असे प्रकार घडतात असे वाहतूक विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले.